Loading...

श्री वेंकटेश आरती

  • Home
  • Aarti
  • श्री वेंकटेश आरती

शेषाचल अवतार तारक तूं देवा l

सुरवर मुनिवर भावें करिती जन सेवा ll


कमलारमणा अससी अगणित गुण ठेवा l

कमलाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ll


जय देव जय देव जय व्यंकटेशा l

केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ll धृ. ll


हे निजवैकुंठ म्हणुनी ध्यातों मी तू तें l

दाखविसी गुण कैसे सकळिक लोकाते ll


देखुनि तुझे स्वरूप सुख अद्‌भुत होते l

ध्यातां तुजला श्रीपति दृढ मानस होते ll


जय देव जय देव जय व्यंकटेशा l

केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ll धृ. ll

श्री वेंकटेश आरती
00:00 00:00
Book A Pandit
Call Now +91 9406095060
WhatsApp

Book Pandit